जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर व त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना धमकी देणार तो व्यक्ती कोण?
News published by News24tas
जालना:– जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना व त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना देखील एका इंस्टाग्राम अकाउंट वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती व त्यामुळे जालना शहरात तणावपूर्ण शांतता पसरून अनेक चर्चांना उधाण देखील आले होते. त्यानंतर शिवसैनिक देखील आक्रमक झाले होते व त्यांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक यांना लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती व पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सत्ताधारी पक्षाच्या आमदार धमकी देणारी व्यक्ती कोण याचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली व अवघ्या काही तासात पोलिसांनी सदरील प्रकरणी एका संशयिताला ताब्यात देखील घेतले व पुढील कारवाई चालू केली.
धमकी देणारा तो व्यक्ती कोण? व धमकीचे नेमके कारण काय?
आमदार अर्जुन खोतकर यांना धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदरील मुलगा हा अल्पवयीन असल्याचे वृत्त मुंबईtak ने दिले असून तसे तपासात उघड झाले आहे. व त्याने हे सर्व काही लाईक व फॉलोवर्स वाढवण्यासाठी केले असल्याची कबुली देखील दिली.त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला सूचना करून सोडून दिले व यासंबंधी पोलिस तपास सुरू असून आणखी कोणत्या व्यक्तीची यात काही भूमिका आहे का हे देखील शोधले जात आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली.
अवैद्य धंद्यावर कारवाई केली त्यामुळे धमकी आली असल्याची शक्यता!
गेल्या अनेक वर्षांपासून जालना शहरात असंख्य अवैद्य धंदे मोठ्या संख्येने चालू होते व त्यावरच अर्जुन खोतकर यांनी विधासभेत अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून जालना शहरात मटका,सत्ता व जमिनींचे गैरव्यवहार या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली त्यामुळे देखील काही लोक मला धमक्या देत असतील अशी शक्यता खोतकरांनी वर्तवली होती,पण असल्या धमक्यांना मी घाबरणारा नाही. त्यांना योग्य भाषेत उत्तर देईल असे देखील अर्जुन खोतकर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.
मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत शोधले संशयित !काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते अलर्ट!
मराठीच्या मुद्द्यावरून आयुक्ताची गाडी फोडण्याचा मनसेचा इशारा.
