अखेर राज्य सरकारकडून भाषा सक्तीचा निर्णय मागे.
News published by News24tas
मुंबई:– पहिली ते पाचवी वर्गाच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने ५ ते ६ दिवसा अगोदर घेतला व आज तोच निर्णय सरकारने मागे देखील घेतला असून यावरून आता राज ठाकरेंनी सरकारला पुन्हा एकदा सुनावल्याचे पहायला मिळाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच हा निर्णय मागे घेण्यात आला असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.
सरकारने मागे घेतलेल्या निर्णयावर काय म्हणले राज ठाकरे?
महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन…
सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती…
ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केलं पण ते करताना कधी दुसऱ्या प्रांतावर मराठी लादली नाही , त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होतात? यातून नक्की काय साध्य करायचं होतं?
असो, ही सक्ती मागे घेतली हे उत्तम झालं. पण या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोकं उभे राहिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
मराठी माणूस जर असाच भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणारांच्या विरोधात असाच उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची मराठी माणसाला गृहीत धरण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे आणि राहील फक्त यावेळेस दाखवलेली एकजूट कायम दिसू दे.
सरकरने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण आलं, पण ठीक आहे निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद…
पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार ! या शब्दात राज ठाकरे यांनी सरकारचे कौतुक करत पुन्हा एकदा ठामपणे सांगितले आहे की महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार.
