हल्ल्यात पोलिस अधिकारी गंभीर जखमी असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आले आहे.
News published by News24tas
भाईंदर:- काल महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात होळी सण हा उत्साहात पार पडला. विविध प्रकारच्या रंगांची उधळण करत भेटी गाठी घेत नागरिकांनी san साजरा केला. परंतु भाईंदर येथे याच उत्साहाला गाल बोट लागले असून एका पोलिस हवालदारावर प्राणघातक हल्ला झालेला असून हल्ला करणारे दोघे जण हे मूळचे परप्रांतिय असल्याचे समोर येत आहे.
पोलिसावर हल्ला का व कशा प्रकारे करण्यात आला?
शुक्रवारी, 14 मार्च 2025 रोजी, भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली परिसरात दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, गस्त घालणारे पोलीस हवालदार काशिनाथ भानुसे भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी, दोन मद्यधुंद तरुणांनी त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात भानुसे यांच्या पोटावर आणि हातावर वार झाले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर, भाईंदरचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी बाबू नेपाली आणि दिलीप भीमबहाद्दूर यांना अटक केली आहे. व पुढील तपास चालू आहे.
https://news24tas.com/इतिहास-चुकीचा-औरंगजेब-हा
