गंगेच्या पाण्यावरून झालेल्या वादात हिंदुस्तानी भाऊची उडी.
News published by News24tas
मुंबई:– राज ठाकरेंनी पक्षाच्या १९ व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात गंगेच्या पाण्यावर व कुंभमेळ्यातील स्नानावर एक भाष्य केले होते त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते व अजून देखील तापलेले आहे. अनेक भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या या विधानाचा निषेध केला तर जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले त्यातच आता हिंदुस्थानी भाऊ याने देखील या प्रकरणात उडी घेतली असून राज ठाकरेंना एक प्रकारे पाठिंबाच दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर हिंदुस्थानी भाऊ नेमका काय म्हणाला?
या संपूर्ण प्रकरणावर हिंदुस्थानी भाऊ याने भाष्य करत राज ठाकरेंची पाठराखण केली असून तो म्हणाला की, एखादे वाक्य चुकीचे बोलल्या मुळे राज ठाकरे हे हिंदू विरोधी आहेत असे बोलणे चुकीचे आहे राज ठाकरेंनी नेहमीच हिंदू साठी व मराठी माणसासाठी उभे असतात त्यांना अशा प्रकारे तोडून टाकू नका. त्याचा असा विरोध करू नका त्यांना साथ द्या ते तुमच्यासाठी बोलतात तुम्ही असे केले तर पुन्हा कोणी तुमच्या साठी बोलण्याची हिंमत करणार नाही असे हिंदुस्तानी भाऊ म्हणाला.
होळीला गालबोट चक्क परप्रांतीयांकडून पोलिसावरच प्राणघातक हल्ला.
