राज ठाकरेंची मोर्चातून माघार! ६ तारखेला मोर्चा होणार नाही?

 

राज ठाकरे यांनी मोर्चा संदर्भात दिली नवीन माहिती.

News published by News24tas

मुंबई:– राज्य सरकारने केलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यभरात सरकार विरुद्ध लोकांच्या मनात तीव्र संताप असताना या संतापला वाचा फोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला असून यासाठी वेगवेगळी आंदोलने देखील राज्य भर केली. कुठे राज्य सरकारच्या जी. आर. ची होळी केली तर काही ठिकाणी बॅनर च्या माध्यमातून सरकावर टिका.राज ठाकरेंनी देखील याला व्यक्तिगत चांगलाच विरोध केला असून आधी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना विनंती वजा इशाऱ्याचे पत्र दिले व हिंदी सक्तीला तुम्ही देखील विरोध करा असे आव्हान देखील सर्व शाळांना राज ठाकरेंनी केले परंतु राज्य सरकारने तरी देखील सदरील निर्णय मागे घेतला नाही त्यामुळे राज ठाकरे यांनी याविरोधात मोर्चा काढण्याचे ठरवले व संपूर्ण मराठी माणसाला तसेच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले परंतु मोर्चा निघण्याआधीच राज ठाकरे यांनी मोर्चा संदर्भात काही महत्वाच्या सूचना त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केल्या आहेत.

६ तारखेला होणारा मोर्चा रद्द!


राज ठाकरे यांनी ६ तारखेला होणारा मोर्चा रद्द केला असून यात काही कारणांमुळे बदल केला असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली असून ६ तारखेला होणारा मोर्चा ५ तारखेला होणार असण्याची माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.६ तारखेला आषाढी एकादशी असल्या कारणाने कदाचित हा निर्णय राज ठाकरेंनी घेतला असावा असे बोलले जात आहे.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या