Jalna/जालन्याचे पहिले महापौर कोण होणार याकडे सर्व जालनेकरांचे आता लक्ष लागले आहे.
News published by News24tas
जालना:- जालना शहरात महानगर पालिका मंजूर होऊन जालना शहराची पालिका आता महानगर पालिका झाली आहे. आताच झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला येथे भरभरून यश मिळाले व आता शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्ष जालना महनगर पालिकेवर आपला झेंडा फडकावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
शिवसेनेचा महापौर पदाचा चेहरा जाहीर.
पत्रकारांशी बोलताना जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आपल्या महापौर पदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नाला उत्तर देत श्री. विष्णू पाचफुले हे महापौर होतील असा विश्वास व्यक्त करत आपल्या पक्षाचा महापौर पदाचा चेहरा समोर आणला आहे.यावेळी खोतकर म्हणले की केंद्रात व राज्यात आमचे सरकार आहे त्यामुळे मी जनतेला विनंती करतो की महानगर पालिका आमच्या ताब्यात द्यावी.
शिवसेना,काँगेस,भाजप व मनसे पक्षाचे मोठे राजकीय बळ.
जालना शहरात तसे तर सर्वच राजकीय पक्षाचे मोठे राजकीय बळ आहे. शिवसेनेचे अर्जुन खोतकर तेथे अनेकदा आमदार राहिलेले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे देखील येथे मोठे राजकीय वर्चस्व राहिलेले आहे अनेकदा नगर पालिका व विधानसभेवर काँग्रेसने आपला झेंडा येथून फडकवला देखील आहे.भाजपचे देखील येथे रावसाहेब दानवे हे २५ वर्ष खासदार राहिले आहे.त्याचबरोबर मनसेचे देखील या शहरात मोठी वोट बँक आहे.त्यामुळे होणाऱ्या महानगर पालिकेत महापौर कोणाचा होतो याकडे अनेक राजकीय विश्लेषक व जनतेचे लक्ष लागले आहे.
आरोपीच्या पळवाटा वाचा पूर्ण बातमी.