Jalna:-जालन्यात दामिनी पथकाची मोठी कारवाई.


जालन्यात दामिनी पथकाच्या पेट्रोलिंग दरम्यान दोन तलवारी जप्त.

News published by News24tas

जालना :- जालना शहरात व जिल्हयात महिला व मुलींना छेडछाड आणि महिलाविषयक गुन्हे घडु नये याकरीता दामिनी पथकास मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल यांनी सुचना देऊन आदेशीत केलेले आहे. त्या अनुषंगाने दिनांक २०/०३/२०२५ रोजी दामीनी पथक नेहमीप्रमाणे जालना शहरात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील अधिकारी अंमलदार यांना माहिती मिळाली की, एक इसम मोटारसायकल बेकायदेशीररित्या तलवारी विक्रीसाठी चंदनझिरा येथुन ग्रेडर टी पॉईट येथे जात आहे अशी खात्रीशिर माहिती मिळाली.

त्यावरुन पथकातील अधिकारी अंमलदार यांनी ग्रेडर टी पॉईट येथे चंदनझिरा कडुन येणा-या मोटार सायकलस्वरास थांबवुन विचारपुस केली असता त्यांने त्याचे नाव ओम विशाल शिंदे वय २१ वर्ष रा. सुंदरनगर, चंदनझिरा जालना असे सांगितले. सदर मोटारसायकरस्वार याचे मोटार सायकलची पाहणी करता गोणीमध्ये लाल व चॉकलेटी रंगाच्या ०२ वेगवेळ्या धारदार तलवार किंमती ८,०००/-रुपये मिळाल्या आहे. सदर आरोपी व तलवारी यांना ताब्यात घेण्यात आलेले असुन त्याचेविरुध्द पोलीस ठाणे चंदनझिरा येथे भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची काम गिरी मा. पोलीस अधिक्षक श्री अजयकुमार बंसल, मा. अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, पोलीस उप अधीक्षक (गृह) मनोजकुमार राठोड, दामिनी पथकाचे महीला पोलीस उप निरीक्षक पुजा कदम, पोलीस अंमलदार विनायक कोकणे, गजानन भवरे, उमा घोरपडे अनिता उईके पोलीस अंमलदार प्रियंका पवार यांनी केली आहे.

या अगोदर देखील जालन्यात धारदार शस्त्रे जप्त.

राज्यासह जालन्यात देखील मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असून या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिस वारंवार प्रयत्न करत आहेत या अगोदर देखील काही दिवसांपूर्वी जालन्यात अनेक तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. व सोशल मीडियावर देखील पोलिस करडी नजर ठेऊन आहेत.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या