जालन्यात विद्यमान व माजी आमदारात रंगले श्रेयवादाचे युद्ध! (JALNA)
news published by news24tas
jalna/जालना:– जालना शहरातील अत्यंत मोठी समस्या म्हणजे पाणी. गेली अनेक वर्षे जालना शहरात कधी १५ दिवस तर कधी ८ दिवसा आड नळाला पाणी येते. आणि हीच समस्या सोडवण्याची ग्वाही झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार व आत्ताचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जनतेला दिला होती. त्याच अनुषंगाने त्यांनी अंबड येथील जल शुद्धीकरण केंद्राला पत्रकारांना बोलवले व चालू असलेल्या कामाची माहिती देत दिलेला शब्द मी दिवाळी पर्यंत पूर्ण करणार असल्याचे सांगितले व सर्व जालना शहरात एक दिवसा आड पाणी येणार ही आनंदाची बातमी समजताच अर्जुन खोतकर यांनी दिलेला शब्द पाळला याची चर्चा सुरू होऊ लागली परंतु त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हणले की, सदरील काम हे माझ्या कार्यकाळात मंजूर झालेले आहे. त्यामुळे आता जालना शहरात पाण्याच्या प्रश्नावरून विद्यमान व माजी आमदारात श्रेयवादाचे युद्ध रंगले आहे.
काय म्हणाले माजी आमदार कैलास गोरंट्याल.(JALNA)
अंबड येथील ३५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला आपल्या कार्यकाळात सुमारे ७२ कोटींच्या निधिसह राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून त्याच वेळी कामाला देखील सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे विद्यमान आमदारांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढून फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी लगावला आहे. जालना शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी राज्यात काँग्रेस आधाडीची सत्ता असतांना आपण जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता आणि सदर प्रस्तावास मंजुरी मिळवून घेतली होती याची आठवण करून देत गोरंट्याल म्हणाले की, या प्रस्तावित योजनेच्या कामात देखील अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या विरोधकांनी केला होता. मात्र, या सर्व अडथळ्यांवर मात करून आपण योजनेचे काम तहीस लावले आणि या योजनेद्वारे जालना शहरातील जनतेला पाणी पुरवठा करण्याचा आपला संकल्प पूर्ण केला, या योजनेचे अंदाजपत्रक तयार करतांना प्रशासकीय पातळीवरून अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्याची क्षमता चुकून १५ एमएलडी इतकी ठेवण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी आणखी ३५ एमएलडी इतकी क्षमता असलेले जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी मंजुरी मिळावी तसेच राष्ट्रसंत गाडगे बाचा जलाशय (घानेवाडी) ते जेईएस महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या एमआयडीसी भागातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत या जीर्ण झालेल्या जलवाहिनीचे नव्याने काम करण्यासाठी आपण राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फड़णचीस यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करून त्या बाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळेच आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात उपरोक्त दोन्हीही कामांना मंजुरी देत राज्य सरकारने त्यासाठी सुमारे ७२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे सांगून त्यानंतर या कामाला आपल्याच कार्यकाळात सुरुवात झाली होती असे असतांनाही विद्यमान आमदार आपण मंजूर करून आणलेल्या व आपल्याच कार्यकाळात सुरू झालेल्या विकास कामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका माजी. आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत शोधले संशयित !काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते अलर्ट!
जालन्यात गुन्हे शाखेच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त.
माझ्यावरचे आरोप खोटे लवकरच मी खटला दाखल करणार आहे-मुंढे
प्रशासनाकडून २६ जानेवारीच्या कार्यक्रमाबाबत मोठी चुकी
भटक्या श्वानावर उपाय योजना कधी ? शहरातील १००० नगरिकांना आत्तापर्यंत चावा.
