Police action:-ओ भाई वाका लवकर!

POLICE

Police action:-कल्याणमध्ये पोलिसांचा सिंघम अवतार गर्दुल्यांना उठाबशा काढायला लावल्या.

News published by News24tas

कल्याणमध्ये गर्दुल्यांसाठी पोलिसांचा काल रात्री उशिरा सिंघम अवतार पाहायला मिळाला. कल्याणचे डीसीपी झेंडे यांनी काल कल्याण स्थानक आणि सभोवतालच्या परिसरात सार्वजनिक जागी चरस-गांजा ओढणाऱ्या गर्दुल्यांना चांगलाच चोप देत त्यांची भर रस्त्यात धिंड काढली.यातील बहुतांश गर्दुल्ले हे परप्रांतिय आल्याचे देखील आढळले. खरंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाला अधिक बळ देणे ही काळाची गरज आहे. आज अनेक ठिकाणी मग त्या झोपडपट्ट्या असोत की उच्चभ्रू वस्त्या, सगळीकडेच अंमली पदार्थांचे सेवन केलेले तरूण झिंगताना दिसत आहेत.

police

वर्दीतील (police)सिंघम चा धाक हा गैर कृत्य करणाऱ्यांना असलाच पाहिजे

व्यसनात असताना तरुणांकडून अनेक गुन्हे घडल्याचे देखील नंतर अमोर येते त्यामुळे या अमली पदार्थांना आटोक्यात आणलेच पाहिजे.असो कल्याण च्या डिसीपी साहेबांनी अतिशय उल्लेखनीय काम केलं आहे आणि अशीच कारवाई सातत्याने व्हावी अशी आशा आहे. वर्दीतील सिंघम चा धाक हा गैर कृत्य करणाऱ्यांना असलाच पाहिजे.यामुळे हे समाजकंटक वठणीवर येऊन महिला आणि मुलींसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत होईल व समाजातील विघातक कृत्यांना आळा बसेल.

कल्याणच्या त्या आरोपीची पळवाट – पुर्ण वाचा.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या