Rape case :- कल्याणच्या त्या आरोपीच्या पळवाटा.मानसिक रुग्ण असल्याचा दाखला पोलिसांना तपासात आढळून आला.
News published by News24tas
कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या विशाल गवळीकडे तो मानसिक रुग्ण असल्याचा दाखला पोलिसांना तपासात आढळून आल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. याच दाखल्याच्या आधारे त्याने यापूर्वी दोन वेळा न्यायालयातून जामीन मिळवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. ठाणे गुन्हे शाखा आणि कल्याण गुन्हे शाखेचे पथक अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरणाचा विविध बाजुने तपास करत आहे. मुलीची हत्या केल्यानंतर विशाल बुलढाणा येथे पळून गेला होता. गुरुवारी सकाळी त्याला ठाणे येथे गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यात आणले. त्याला नौपाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने विशालला पत्नीसह दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
विशालवरील यापूर्वीचे गुन्हे आणि त्याने हे कृत्य का केले, त्याच्या सोबतीला अन्य कोणी साथीदार होते का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या तपासातून विशालकडे तो मानसिक रुग्ण असल्याचे दाखले असल्याचे पुढे आले आहे. या दाखल्याच्या आधारे विशालने यापूर्वी न्यायालयातून जामीन मिळविले आहेत, अशीही माहिती तपासात पुढे येत आहे. विशालवर एकूण सहा गु्न्हे दाखल आहेत. यामध्ये विनयभंग, जबरी चोरी, मारहाण या गुन्ह्यांचा अंतर्भाव आहे. यापूर्वी त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा कल्याणमध्ये परतला. विशालसारखेच इतर चार गुन्हेगारांकडे ते मनोरुग्ण असल्याचे दाखले आहेत, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. हे गुन्हेगार मानसिक रुग्ण असल्याचे दाखले त्यांना कोणी दिले. कशाच्या आधारावर दिले, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुंबई महाराष्ट्रात की परप्रांतात वाचा सविस्तर.