इतिहास चुकीचा! अबू आझमी कडून औरंगजेबाचे कौतुक.
News published by News24tas
मुंबई:- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी असेच काहीशे वक्तव्य केल्या मुळे राज्यात वाद निर्माण होणार हे निश्चित.
सर्वत्र छावा चित्रपट प्रदर्शित झाल्या पासून संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला पुन्हा एकदा जागृत करण्याचे काम या चित्रपटाने केले आहे. त्याचबरोबर औरंगजेबाने केलेल्या अत्याचार व अन्यायाला देखील पुन्हा एकदा उजाळा या चित्रपटामुळे मिळाला आहे. अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी चक्क औरंगजेबाचे कौतुक करत म्हणले की, इतिहास चुकीचा दाखवला जात असून औरंगजेब हा एक उत्तम प्रशासक होता.त्याने अनेक मंदिरे बांधली.त्यांच्या काळात भारताचा जीडिपी २४ टक्के होता तसेच औरागजेबाच्या काळात भारताला सोनेकी चिडिया म्हटले जायचे. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचे म्हणू का असा सवाल करत अबू आझमी एवढ्यावरच थांबले नाही तर चक्क संभाजी महाराज व औरंगजेब यांच्यातली लढाई ही सत्तेसाठी होती धर्मासाठी नाही असे ते म्हणाले.
अबू आझमी वर आदित्य ठाकरेंचा निशाणा.
सदरील वक्तव्यावर बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अबू यांचा चांगलाच समाचार घेतला असून महाराष्ट्रात वादाची ठिणगी पाडण्याचे काम हे लोक करतात कोणाची सुपारी हे घेतात असे म्हणत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
अबू आझमी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे शिंदे.
आझमी यांच्या वक्तव्यावरून अनेकांच्या प्रतिक्रिया येत असून यावर एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हणले की, आझमी यांच्यावर असली वक्तव्ये केल्या मुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.ज्या औरंगजेबाने महाराजांना हाल हाल करून मारले त्याचे उदात्तीकरण करणे हे फार दुर्दैवी आहे.जेवढा या वक्तव्याचा निषेध करू तेवढा थोडा आहे असे शिंदे म्हणाले.
जालना:- मनसेतर्फे शहरात अनेक ठिकाणी छावा चित्रपटाच्या मोफत शो चे आयोजन.
