जरांगे जी गाडी वापरतात ती देखील वाळू माफियांची लक्ष्मण हाके यांचा जरांगे पटलांवर निशाण.
news published by news24tass
जालना:- मराठा- ओबीसी आंदोलनाची सुरवात ज्या जालना जिल्ह्यातून झाली त्याच जिल्ह्यातील अवैद्य धंदे आता समोर येत असून अवैध वाळू वाहतुकी प्रकरणी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर व त्यांच्यासह इतर ८ जणांवर जिल्हा प्रशासनाकडून अंबड उपविभागीय न्यायदंडअधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली असून यावरून आता पुन्हा मराठा- ओबीसी असा वाद निर्माण होताना दिसत आहे. सदरील तडीपारीच्या कारवाई नंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हणले,जरांगे जी गाडी वापरतात ती देखील वाळू माफियांचीच.एवढेच नाही तर या वाळू माफीयांनी अनेक ओबीसी नेत्यांवर हल्ले देखील केले आहेत माझ्यावर देखील पुण्यात याच तडीपारीची कारवाई झालेल्या लोकांनी हल्ला केला होता असे हाके म्हणाले.
लक्ष्मण हाके यांची जरांगेसह सुरेश धस यांच्यावरही टिका .
लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी बोलत असताना जरांगे पाटील यांच्यासह सुरेश धस यांच्यावरही टिका केली असून सुरेश धस यांनी संतोष सूर्यवंशी प्रकरणातील पोलिसांना माफ करावे असे जे वक्तव्य केले आहे. त्यावरून हाके म्हणाले की, सुरेश धसयांचा खरा जातीवादी चेहरा समोर आला असून धस ज्या मतांवर निवडून येतात त्याच ओबीसी नेत्यांवर गरळ ओकतात खरंतर संतोष सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करू नका असे सुरेश धस म्हणूच कसे शकतात त्यांच्या डोक्यावर इलाज करायची खरंच गरज आहे अशी जहरी टिका हाके यांनी केली.
