जालना:- मनसेतर्फे शहरात अनेक ठिकाणी छावा चित्रपटाच्या मोफत शो चे आयोजन.

छावा चित्रपटाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद.

News published by News24tas

जालना:-संभाजी महाराजांच्या पराक्रमावर,त्यांच्या जीवनावर व इतिहासावर आधारित छावा चित्रपट सर्वत्र १४ फेब्रुवारी ला प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात विक्की कौशल मुख्य भूमिकेत असून विक्की कौशल यात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असून हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे.त्याचबरोबर छावा चित्रपटाने आत्ता पर्यंत सर्वत्र एकूण ६०० कोटींहून अधिकची कमी केली असून प्रेक्षकांनमध्ये या चित्रपटाची भुरळ कायम असल्याचे दिसून येत आहे.महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा संपूर्ण भारतभर या चित्रपटामुळे जागृत होत असून अनेक ठिकाणी या चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन देखील केले जात आहे.

मनसेकडून शहरात अनेक ठिकाणी ‘छावा’ चे मोफत शो.

महाराजांचा गौरवशाली इतिहास सर्वांना विशेषतः तरुण पिढीला कळवा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना शहर पदाधिकारी यांच्या तर्फे अनेक ठिकाणी छावा चित्रपटाचे अनेक मोफत शो चे आयोजन करण्यात आले असून २२ फेब्रुवारी रोजी शहरातील कृष्णा मॉल येथे व काल दिनांक ०२ मार्च रोजी संजय नगर येथे नागरिकांना हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला.या कार्यक्रमाला मनसे जालना जिल्हा अध्यक्ष रवी राऊत यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष महेश नागवे, शरद मांगधरे,राहुल रत्नपारखे, विलास तिकांडे, वैभव साळे व अन्य पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा आमचे telegram चॅनल .

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या