जालना | दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार आयुक्त खांडेकर.
News published by news24tas
जालनाः- शहरातील दिव्यांगांचे प्रश्न व मागण्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिले. दिव्यांगांनी काही दिवसांपूर्वी उपोषण केले होते. त्या उपोषणाची दखल घेत आयुक्तांनी 14 फेब्रुवारी रोजी तातडीने बैठक घेऊन दिव्यांगांना आश्वास्त केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, इंजिनीयर शेख साउद, महाराष्ट्र राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे निता ढवाळ, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी शकुंतला कदम, राष्ट्रवादी सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे, शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले, दिव्यांग आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे, रवींद्र अंभोरे राष्ट्रवादी युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे, शहराध्यक्ष गीतांजली ढवळे, रिंंकल तायड यांची प्रमुख उपस्थिती होती.
खुर्चीवरून जालना पालिका सभागृहात वाद.
जालना महानगरपालिकेचा सभागृहात दिव्यांगाची प्रश्न सोडवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी शकुंतला कदम यांचा खुर्चीवरून उठा असा अपमान केल्यामुळे शकुंतला कदम यांनी भर बैठकीतून काढता पाय घेतला. कदम यांना अनेकांनी विनंती केली मात्र त्या थेट निघून गेल्याने बैठकीला वादाचा डाग लागला.
जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिव्यांगाना फोनवरून साधला संवाद.
वैयक्तीक कामामुळे जालन्यात नसल्या कारणाने बैठकीस उपस्थित राहता आले नाही परंतुदिव्यंगाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न महानगर पालिकेने तात्काळ सोडावेत अशा सूचना आ. अर्जुन खोतकर यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांना दूरध्वनीवरून दिल्या. आपण दिव्यांग बांधवांच्या पाठिशी असल्याचे आश्वासन अर्जुन खोतकर यांनी दिले त्याचबरोबर काही दिव्यांगांसोबत खोतकर यांनी संवादही साधला.
