रात्री ऊशिरापर्यंत चालू असलेल्या दुकानांवर पोलीसांची कारवाई होणार -पो.निरिक्षक. संदिप भारती.
News published by news24tas
जालना :- नागरीकांनी वेळेचे बंधन पाळून आपली दुकाने ११ च्या आत बंद करावे; पो.निरि. संदिप भारती यांचे व्यावसायिक व सामान्य नागरिकांना आवाहन.जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री ऊशिरापर्यंत चालू असलेल्या अस्थापनांवर सध्या पोलीसांची करडी नजर असून दोन दिवसापासून रात्री ऊशिरापर्यंत चालू असलेल्या विविध दुकानांवर सदर बाजार पोलीसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदिप भारती यांनी सदर बाजार हद्दीमधील सर्व दुकान चालकांना अवाहन केले आहे की, व्ययसायिकांनी आपआपले अस्थापने जे रात्रीच्या वेळेचे बंधन दिलेले आहे त्यानुसार बंद करावे. शहरातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सर्व व्यवसायिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. व कुणीही रात्री ऊशिरा पर्यंत आपले दुकाने चालू ठेवू नये. अन्यथा अशा दुकानांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल.
जालना शहरात कारवाईस सुरवात .
जालना शहरातील करवा नगर येथील जैन पावभाजी या दुकानावर पोलिसांकडून कारवाई करणे करण्यात आली असून रात्री उशिरा १२ वाजेपर्यंत दुकान चालू ठेवून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.दुकानदारावर कलम ३३ RW महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.
