नागरिकांना त्रास देणे थांबवा अन्यथा मनसे कार्यकर्ते फायनान्स वाल्यांना चोप देतील.
news published by news24tas
जालना:- शहरातील विविध भागात फायनान्स कंपन्या आधी लोन देऊन नंतर बेकायदेशीरपणे वसुली करत असून सामान्य नागरिकांकडे गुंड प्रवृतीचे लोकं पाठवत आहे व कर्जाची वसुली करत आहेत.असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव विलास तिकांडे यांनी फायनान्स कंपन्यांना सज्जड दम देत अशा प्रकारची वसुली तत्काळ बंद करावी अन्यथा आमच्याशी गाठ आहे असा इशारा दिला आहे.यावेळी बोलताना मनसेचे जिल्हा सचिव म्हणाले की, कायद्यानुसार वसुली करण्यास आमचा विरोध नाही परंतु मार्च महिना जवळ येत असल्यामुळे जी बेकायदेशीरपणे वसुली चालू आहे व वसुली करतेवेळी जी असभ्य भाषा वापरून असभ्य वर्तन या कर्मचाऱ्यांकडून केले जाते ते तात्काळ थांबवा. अन्यथा आम्ही चोप देऊ असा इशारा त्यांनी बोलते वेळी दिला.
जालन्यात अनेक नागरिक फायनान्स कंपनीच्या त्रासाने त्रस्त.
जालना शहरातील अनेक नागरिक या विविध फायनान्स कंपन्यांच्या त्रासाला कंटाळले असून वारंवर या फायनान्स कंपन्या गुंड प्रवृतीचे लोकं पाठवून वसुली करतात.त्याचबरोबर कधी पण घरी येऊन असभ्य भाषा वापरतात तर कधी कधी रस्त्यातच धरून हफ्ते भरा असे म्हणतात. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक जणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली असून मनसेच्या इशाऱ्यानंतर पुन्हा एकदा या नागरिकांची या त्रासातून सुटका होते का पाहावे लागेल.
छावा बघून दिल्लीतले तरुण जागी झाले पण महाराष्ट्रातले मावळे का नाही?
https://news24tas.com/छावा-चित्रपट-पाहुन-विश्व/
