जालन्यात तब्बल ११ हजार बांगलादेशी खुसखोर किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा.
news published by news24tas
जालना :-देशातील विविध भागात बांगलादेशातील रोहिंगे यांनी घुसखोरी केली असून महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत. राज्यातील टॉप टेन ठिकाणांमध्ये यादीत जालना जिल्हयातील भोकरदन तालूक्याचा समावेश असून जालना जिल्ह्यात ११ हजार ४९१ बांगलादेशी घुसखोर असल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.
फौजदारी गुन्हा दाखल करून करवाई करण्यात येणार -जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
किरीट सोमय्या यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, शहराध्यक्ष सिद्धिविनायक मले यांची उपस्थिती होती. त्यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्याना भारतीय बनविण्याचे षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे. मागील १० महिन्यात राज्यात २ लाख १४ हजार बांगलादेशी घुसखोर आले. यांनी ३०, ४०,५०, ६० वर्षांपुर्वी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे बोगस कागदपत्रे सादर करून यापैकी १ लाख १३ हजारांवर घुसखोरांनी प्रमाणपत्रे मिळवलली आहे. हे प्रमाणपत्रे तहसीलदारांनी दिलेले आहे. हा अधिकार यापुर्वी न्यायाधीशांना होता. त्यामुळे हा गैरप्रकार फडणवीस यांच्या लक्षात आल्यामुळे आता फडणवीस सरकारने या सर्व प्रमाणपत्रांना स्टे दिला आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. अशा पद्धतीने बोगस कागदपत्रे देऊन बांगलादेशातील घुसखोरांनी प्रवेश केला आहे.त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून करवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले, असेही सोमय्या म्हणाले.
ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे प्रमाणपत्रे दिली आहे, त्यांच्यावर चौकशीअंती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगूनसोमय्या म्हणाले की, राज्यातील टॉप टेन तालुक्यात जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात ११ हजार ४९१ पैकी ७ हजार १५७ जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहे. ३३७० प्रलंबित आहे. १६४
अर्ज फेटाळण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, फोरेन्सिक ऑडिट केले पाहिजे, कशा पद्धतीने बोगस पुरावे, कागदपत्रे दिले, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण केल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.
