ठाकरे ब्रँड संपला हा गैरसमजच!

ठाकरे ब्रँड संपला हा गैरसमजच!

राज ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे नावातच दरारा आणि एक वेगळा आदर जो मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळतोच पण विधानसभेच्या निवडणुकीत लागलेला निकाल पाहता अनेकांनी ठाकरे ब्रँड संपले की काय असा प्रश्न उपस्थित केला परंतु हा अनेकांचा गैरसमज ठरू शकतो त्याला कारणेही तशीच आहेत. स्वतःचा पक्ष, नेते, आमदार आणि चिन्ह जाऊन देखील लोकसभेत उद्धव ठाकरेंना मिळालेले यश हे इतक्या सहजा सहजी विसरून चालणार नाही. उद्धव ठाकरेंवर अनेक वेळा शिवसेना संपली की काय असे प्रश्न उपस्थित करण्यात आले परंतु मिळालेल्या प्रभावातून धडा घेत त्या पेक्षा दुप्पट यश मिळवत शिवसेनेने अनेकवेळा विरोधकांना मैदान दाखवले.

त्याचबरोबर राज ठाकरे यांचे देखील तसेच काहीशे

२००६ साली पक्ष स्थापनेच्या निवडणुकी नंतर मनसेचे अवघे ७ नगरसेवक निवडून आले होते त्यावेळी त्यांच्या बद्दल देखील अनेक वर्तमान पत्रात ”THE PARTY IS OVER” अश्या हेडलाईन्स छापून आल्या होत्या.परंतु २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने एकच झटक्यात १३ आमदार निवडून आणत आपले अस्तित्व सिद्ध केले होते त्यानंतर नाशिक,मुंबई,पुणे,तसेच अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकीत यश मिळवत मनसे ने आपले अस्तित्व सिद्ध केले परंतु मागील १० वर्षाचा मनसे चा आलेख पाहता मनसे साठी पुढील काळ हा त्रासदायकच जरी असला तरी एखाद्या फिनिक्स पक्षा प्रमाणे राखेतून पुन्हा जिवंत होत राज ठाकरे आपले अस्तिव निर्माण करतील.

राज ठाकरेंमागे उभी असलेली कार्यकर्त्याची फळी त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकणारे त्यांचे महाराष्ट्रसैनिक,साहेबांनी दिला तो आदेश कुठलाही विचार न करता पळणारे त्यांचे कार्यकर्ते ही राज ठाकरेंसाठी जमेची बाजू येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणूकीत हेच त्याचे विश्वासू महाराष्ट्र सैनिक दोन्ही ठाकरेंना त्यांचे अस्तिव निर्माण करण्या साठी त्याच्यावर ‘ठाकरे ब्रँड संपले’ की काय असे प्रश्न उपस्थीत करणाऱ्या विरोधकांना घरचा रस्ता दाखवतील असा विश्वास ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील असंख्य लोकांना आहे.

त्याचबरोबर दोन्ही भावने एकत्रित मराठी माणसाला न्याय द्यावा अशी अनेक शिवसैनिक व महाराष्ट्रसैनिकाची इच्छा असल्याचे त्याच्याशी बोलताना जाणवले आता येणारा काळच ठरवेल ठाकरे ब्रँड काय चमत्कार करणार दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही ?

याबद्दल आपल्या काय वाटते त्याचे मत देखील नोंदवा.

 

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या