डोळ्यात मिर्ची पावडर टाकून 3 लाख रुपये लुटले.

डोळ्यात

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात डोळ्यात मिर्ची पावडर टाकून 3 लाख रुपये लुटले सदरील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Published by news24tas

जालना:- डोळ्यात मिरची पूड टाकून तीन लाख रुपये लुटण्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी जालना जिल्यातील परतूर शहरात घडली होती. लुटमारीची घटना परतूर येथील एका किराणा दुकानदारा  सोबत घडली असून दुकानदाराच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून जवळपास तीन लाख रुपये लुटण्यात आले होते सदरील आरोपीला पोलिसांनी आवघ्या १५ दिवसात अटक केली आहे.

 

डोळ्यात मिर्ची टाकणाऱ्या आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

परतूर येथील प्रसाद क्रांतीलाल पोरवाल हे १६ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मलंगशहा चौक येथे असलेले त्यांचे किराणा दुकान बंद करून तीन लाख रुपये कापडी पिशवीत टाकून दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी चोरट्याने त्यांना अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच त्यांच्याकडील दुचाकीला अडकवलेली तीन लाख रुपये असलेली कापडी पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेले होते. प्रसाद पोरवाल यांच्या फियार्दीवरून परतूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची चक्रे फिरवली असता सराईत गुन्हेगारांची चौकशी करत असताना आरोपी अमीर उर्फ अमेर अमन कुरेशी (रा. लड्डा कॉलनी) यास विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने इतर २ साथीदारांच्या मदतीने तीन लाख रुपये चोरल्याची कबुली दिली आहे. चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी एमएच २१, डीएक्स २९४२ पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच परतूर येथील ‘सब के फायनान्स’ येथून चोरीस गेलेली एक पावरट्रेक कंपनीची इन्व्हर्टर बॅटरी जप्त करण्यात आलेली आहे. आरोपीची विचारपूस सुरू आहे. अनेक चोऱ्या उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे, उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, सतीश जाधव, दीपक आडे, अच्युत चव्हाण, विजय जाधव यांनी केली आहे.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

https://news24tas.com/ज्यांच्यामुळे-विजय-मिळवल/

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या