कबर बघायला सहल घेऊन गेली पाहिजे गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य.
मुंबई:- आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेचा दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुढीपाडवा मेळावा लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला असून राज ठाकरे यांनी मागील काही दिवसात राज्यात घडलेल्या घटनांवर टीका टिपणी केली असून आता यावरून राज्यात काय राजकारण रंगते ते पाहावे लागेल. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात होत असलेल्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की चित्रपट बघून जागी होणारे हिंदू काय कामाचे? असा प्रश्न करत राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरूची आपली भूमिका स्पष्ट केली.
कबर काढावी की नाही?काय म्हणले राज ठाकरे ?
सभेमध्ये बोलताना राज ठाकरे औरंगजेबाच्या कबरीवरून काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. राज ठाकरेंनी देखील आपली स्पष्ट भूमिका मांडत कबर काढली पाहिजे की नाही? या प्रश्नावर उत्तर देत कबर काढण्यास विरोध केला असून त्या ठिकाणी जे उदात्तीकरण होते त्याला विरोध केला आहे. व राज ठाकरे म्हणाले की ते जे सजवलेले आहे न कबरीजवळ ते काढून टाका नुस्ती कबर ठेवा आणि तेथे बोर्ड लावा की आम्हा ‘मराठ्यांना मारायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, संपवला गेला ‘ तिथे लहान मुलांच्या सहली घेऊन गेले पाहिजे त्यांना ही गोष्ट कळू दे असे देखील राज ठाकरे म्हणाले.
शेतकरी कर्ज माफीवरून देखील राज ठाकरेंनी केली सरकारवर टीका.
राज ठाकरेंनी सभेत बोलतांना लाडकी बहीण योजने पासून ते शेतकरी कर्ज माफीवर देखील भाष्य केले आहे. निवडणुकीत या तिन्ही पक्षांनी लाडकी बहीण लाडकी बहीण केले मी तेव्हा देखील बोललो होतो आणि आता देखील सांगतो की ही योजना बंद होणार आहे. तसेच ज्या प्रमाणे शेतकरी कर्जमाफी करू म्हणून निवडणुकीपूर्वी सरकारने सांगितले होते पण येणं वेळेवर कर्जमाफी वगैरे काही नाही कर्जाची परतफेड करावी लागेल असे सरकार म्हणत आहे. अशा प्रकारे राज ठाकरेंनी सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून टीका केली आहे.
