जालना महानगर पालिकेच्या विरोधात दिव्यांगाचे आमरण उपोषण.
news published by news24tas
जालना:- अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या दिव्यांगांच्या मागण्या अनेक निवेदने देऊन देखील सुटल्या नसल्याने जालना शहरातील दिव्यांग बांधवांनी ५ फेब्रुवारी पासून विविध मागण्यांसाठी जालना महानगर पालिकेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले असून जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या आंदोलनात कुठल्याही प्रकारची जीवित हाणी झाल्यास त्याला जबाबदार पालिका आयुक्त असतील असे देखील दिलेल्या निवेदनात म्हणले असून आता तरी दिव्यांगाच्या मागण्या मान्य होणार का हे बघावे लागेल.
दियांगाच्या जालना महानगर पालिकेकडे नेमक्या मागण्या कोणत्या?
1. दिव्यांगाना व्यवसाया साठी महानगर पालिकेकडून 200 sq. फूट जागा मिळणे
2. दिव्यांगासाठी 5% निधीतून साहित्य वाटप करणे.
3. दिव्यांगाना घरपट्टी, नळ पट्टी 50% माफ करणे.
4.दिव्यांगाना घरकुल मध्ये प्राधान्य देणे.
अशा विविध मागण्या पूर्ण होण्या करीता महानगर पालिकेत दिव्यांग आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला सतिश फतपुरे,नागोजी मनोहर आंबिलवादे, सुनंदा भास्करे रंगनाथ शिंदे,रेहान शेख प्रकाश एडके, भीमराव साळवे,तुलजीराम घटे, साबेर शैख इब्राहीम भाई व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल जालना आदी उपस्थित आहेत.
