धनंजय मुंढेवर त्यांच्याच मामीचा आरोप.मुख्यमंत्र्यांची भेट घेत राजीनाम्याची मागणी.
News published by News24tas
मुंबई:– धनंजय मुंढे आणि वाल्मीक कराड गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात फक्त हे दोनच नावे प्रसार माध्यमे व सोशल मीडियावर गाजत आहेत. त्यातच आता धनंजय मुंढे यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही.कारण धनंजय मुंढे यांच्याच मामीने त्यांच्यावर गंभीर आरोप केलंय.
नेमके प्रकरण आहे तरी काय ?
धनंजय मुंडे यांनी माझी परळीमधील जमीन हडपली. धनंजय मुंडे हा माझा भाचा आहे. त्याने मला गोड बोलून परळीला बोलावलं आणि माझ्याकडून जमिनीच्या कागदोपत्री सह्या घेतल्या. साडे ३ कोटींची जमीन ही फक्त २१ लाखांना माझ्याकडून घेतली गेली. या सगळ्याला पंकजा मुंडे यांचीही मूकसंमती होती. त्या ही धुतल्या तांदळाच्या नाहीत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर घ्यावाच पण आमदारकीही काढून घ्यावी, अशी विनंती सारंगी महाजन यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
फडणवीस यांना भेटून आल्यावर सारंगी महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी माझी फसवणूक केल्याचे मी मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिला आहे की योग्य तो न्याय केला जाईल. लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करून आम्ही तुम्हाला न्याय देऊ, तुम्ही निश्चिंत राहा, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले.
धनंजय मुंढेची आमदारकी रद्द करा .
तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर घ्यावाच पण आमदारकीही काढून घ्यावी, अशी मागणी मी फडणवीस यांच्याकडे केल्याचेही सारंगी महाजन यांनी सांगितले. परळीचे पोलीस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये साटंलोटं आहे. मी परळीतल्या जनतेकडून आवाज उठवत असल्याचेही त्या म्हणाल्या.
