सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची संपूर्ण हकीकत धस यांनी सभागृहात मांडली.
News published by news24tas
बीड:- बीड जिल्यातील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अत्यंत क्रूरपणे त्यांना जीव मारण्यात आले.या खुनात बीड मधील अनेक मोठे नावे समोर येत असून आता सी.आय.डी. अथवा पोलिसांकडून या हत्येची चौकशी न होता या साठी स्वतंत्र एस.आय.टी. स्थापन करून संतोष देशमुख यांना न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी सभागृहात आमदार सुरेश धस यांनी केली.
यावेळी त्यांनी ३० मिनिटे भाषणं करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला कशाप्रकारे या वादाला सर्वात झाली कोण कोणते आरोपी यात होते. कोणती गाडी या गुन्ह्यात वापरण्यात आली तसेच संतोष देशमुख यांना २०० ते २५० फटके मारण्यात असेल त्यामुळे त्यांच्या शरीरात तब्बल २ लिटर रक्त गोठले,त्याचे डोळे लायटर ने जाळण्यात आले हे सर्व करत असताना कोणा कोणाला व्हिडिओ कॉल आरोपीने केले या सर्वावर सुरेश धस यांनी भाष्य करत अनेक मुद्दे समोर आणले.
नेमके काय म्हणले सुरेश धस ?
📍विधान भवन, नागपूर आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विविध मुद्दे मांडले.
• नुकत्याच झालेल्या परभणीच्या घटनेत स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी विनंती केली.
• सोनपेठ, गंगाखेड परिसरासह बीड जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केला जातो. हा देखील मुद्दा मांडला.
• बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा सारा वृत्तांत मांडत सदर घटनेतील आरोपींवर तात्काळ योग्य ती कारवाई करून स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.
#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024
#Maharashtra #wintersession2024
#नागपूर #sureshdhas #मस्साजोग #केज
#संतोषदेशमुख #सोमनाथसूर्यवंशी #अपहरण #न्यायमागणी
