पुण्यात वाद पेटणार! ABVP विरुद्ध MNVS.

पुण्यात मनसे विद्यार्थी सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत वादाची ठिणगी.

News published by News24tas

पुणे:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा नवा वाद पुण्यातील कॉलेजमध्ये सुरू होण्याची आता शक्यता असून दोन विद्यार्थी सेना यामुळे आमने सामने येणार असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वाडिया महाविद्यालयात “कॉलेज कॅम्पस कनेक्ट” उपक्रम राबवला असता, त्या फलकावर ABVP कार्यकर्त्यांनी स्प्रे पेंटिंगद्वारे रंग मारून विटंबना केली. याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र निषेध नोंदवत, दोषींवर त्वरित कारवाईची मागणी केली. तसेच, जर कारवाई झाली नाही, तर शहरातील सर्व ABVP फलक काळे करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी केले. तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, सारंग सराफ, शैलेश विटकर, रवी बनसोडे, विक्रांत भिलारे, परिक्षीत शिरोळे, सचिन ननावरे आणि अन्य पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसे कार्यकर्त्यांनी देखील ABVP च्या नावावर फासले काळे.

या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आक्रमक पवित्रा घेत कॉलेज परिसरातील जॉइन ABVP असे मजकूर असलेल्या भिंतींवर काळे फासत आंदोलन केले असून आम्ही राज ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत आमच्या वाटेला जाऊ नका असे म्हणत ABVP ला इशारा दिला. २००ते ३०० विद्यार्थी मनसे विद्यार्थी सेनेशी जोडले गेले त्यामुळे त्यांनी त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात मनसेत विद्यार्थी प्रवेश करताय बघून या गोष्टीला ते घाबरले व आमच्या बोर्ड ची त्यांनी विडंबन केली असे मनसे कार्यकर्ते म्हणले.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या