प्राजक्ताने चक्क धासंचे आभार मानले. आभार मानत प्रकरणावर पडदा.
News published by News24tas
बीड येथे झालेल्या मोर्चात बोलताना धस यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर टीका केली होती त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी महिलांना अशा प्रकारे बोलले नाही पाहिजे. स्त्रियांचा एकप्रकारे हा अपमान आहे असे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती त्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया यावर येत होत्या मराठी सिनेकलाकारांनी देखील प्राजक्ता माळी यांची बाजू घेत सुरेश धास यांनी माफी मागावी असे म्हणले होते.त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती. व पुढे काय कार्यवाही होते याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना आज प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांचे आभार मानले.
धसांना काय म्हणाल्या प्राजक्ता माळी.
ज्यांनी ज्यांनी मला या विषयात पाठिंबा दिला यांचे सर्वांचे सर्वांचे व सर्वच महाराष्ट्राचे आभार. महिलांच्या सन्मानासाठी सर्वच स्तरातून आवाज उठवला गेला,पाठिंबा दिला गेला त्यामुळे मला खरंच खूप मोठे बळ मिळाले.त्याचबरोबर आदरणीय आमदार सुरेश दादा धस यांचे मी मनापासून आभार मानते त्यांनी देखील मोठ्या मनाने सर्व स्त्रियांची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे यापुढे मी कोणतीही तक्रार अथवा कार्यवाही करणार नाही असे देखील प्राजक्ता म्हणाल्या.
