महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर महायुतीकडून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
मुंबई:- महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी भाजप व महायुती कडून करण्यात येत आहे. ५ तारखेला होणाऱ्या शपथविधीला उध्दव ठाकरेसह देशातील १९ राज्याच्या मुख्यमंत्री व मुख्य नेत्यांना आमंत्रण महायुती कडून देण्यात आले आहे. या सोहळ्याला अनेक संत महांतना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून राज ठाकरे यांना आमंत्रण दिल्याची माहिती समोर येत आहे .
राज ठाकरे उपस्थित राहणार का?
राज ठाकरे यांच्या पारिवारिक भेटीगाठी ठरलेल्या असल्यामुळे आणि ते वैयक्तिक कारणास्तव शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना कळवली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती देत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाबाबत शुभेच्छा देखील दिल्या.
शरद पवारांना देखील निमंत्रण.
आजच्या शपथविधीला राज्यातील बड्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून निमंत्रण दिलं आहे. मात्र, काही नेते वैयक्तीक कारणास्तव आणि राज्यसभेच्या अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत अशी माहिती आहे. आज होणाऱ्या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना निमंत्रण दिलं आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शरद पवार शपथविधीला येणार नाहीत अशी माहिती आहे.
इतर राज्याचे मुख्यमंत्री देखील उपस्थीत राहणार.
योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू – मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
नितीन कुमार – मुख्यमंत्री, बिहार
प्रेमा खांडू – मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा – मुख्यमंत्री, आसाम
विष्णूदेव साय – मुख्यमंत्री, छत्तीसगढ
प्रमोद सावंत – मुख्यमंत्री, गोवा
भूपेंद्र पटेल – मुख्यमंत्री, गुजरात
नायब सिंह सैनी – मुख्यमंत्री, हरियाणा
मोहन यादव – मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
कॉनराड संगमा – मुख्यमंत्री, मेघालय
भजनलाल शर्मा – मुख्यमंत्री, राजस्थान
मानिक साहा – मुख्यमंत्री, त्रिपुरा
पुष्कर सिंह धामी – मुख्यमंत्री, उत्तराखंड
कोण कोणते संत महंत उपस्थीत राहणार?
नरेंद्र महाराज नानीद
नामदेव शास्त्री, भगवानगड
राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन
गौरांगदास महाराज, इस्कॉन
जनार्दन हरीजी महाराज
प्रसाद महाराज अंमळनेरकर
महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज
जैन मुनी लोकेश
News published by https://news24tas.com/
