बदलापूर एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश.

बदलापूर येते झालेल्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी न्यायालयाची मोठी  कारवाई.

news published by news24tas

बदलापूर:- बदलापूर येथे झालेल्या बाल अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काउंटर पोलिसांच्या चांगलाच अंगलट आला असल्याचे आता दिसत आहे. दोषी पोलिसांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारवर उच्च न्यायालयाने चांगलीच चपकर लावली. या एन्काउंटर च्या चौकशीसाठी एसआयटी स्थापना करताना याप्रकरणी पोलिसांवर गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने एसआयटीला दिले आहेत.त्यामुळे अखेर पोलिस निरीक्षक निलेश मोरे,पोलिस हवालदार अभिजित मोरे,हरीश तावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे!

न्यायिक चौकशी अहवाल व याचिकाकर्त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा घडल्याचे स्पष्ट होत असताना देखील सीआयडी व पोलिसांनी याचा गुन्हा का नोंदवला नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचबरोबर चौकशी अहवाल आल्यानंतर गुन्हा नोंदवण्याचा विचार करू या शासनाच्या भूमिकेला न्यायालयाने चपकर लावली. हा आयोग. केवळ शिफारशी करू शकतो.दंडाधिकारी चौकशी अहवालाला कायदेशीर आधार आहे.तरीही आयोगाच्या अहवालाची तरी आयोगाच्या अहवालाची शासन का वाट पाहत आहे ,असा सवाल कोर्टाने सरकारला केला आहे.

मुंढेचं पितळ उघडे पण बाकी नेत्यांचे काय?

शिवाजी महाराजांचे बॅनर फाडल्याच्या घटनेला नवीन वळण.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या