लाडक्या बहिणींना महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाचे विसर मानधन वाढ कधी?
News punlished by News24tas
Mumbai:- राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मिळणारे १५००/- रुपयाचे मानधन विधानसभा निवडणुकीनंतर वाढवून २१००/- रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु निवडणुका होऊन दोन महिने लोटले तरी देखील मानधनात वाढ करण्यात आली नसून आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे असेच दिसते त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही अश्या शब्दात अनिल देशमुख यांनी सरकारला सवाल करत युती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे.
मानधन वाढवा अन्यथा आंदोलन.
लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन शासनाने तत्काळ पूर्ण करावे. छाननीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात येत आहेत. असे झाल्यास आम्ही राज्यात मोठे आंदोलन उभे करू! असे देखील देशमुख म्हणले असून येणाऱ्या काळात लाडक्या बहिणीनंमुळे राज्याचे राजकारण तापणार असेच दिसत आहे.
अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन.
मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.
