बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या आणि मिळवा १००० रुपये मनसे चा अनोखा उपक्रम.
news published by news24tas
बदलापूर:- सध्या देशात व राज्यात बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा मोठया प्रमाणात गाजत असून अनेक नेते यावर अनेक दिवसापासून आंदोलने व भाष्य करत आहेतच. त्यातच आता पोलिसांना मदत होण्या करीत मनसेच्या नेत्या मनसे बदलापूर महिला शहर अध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी एक नवीन उपक्रम हाती घेत जो कोणी बांगलादेशी फेरीवाल्यांची माहिती देईल त्याला रोक १००१/- (एक हजार एक रुपये ) देण्यात येईल असे जाहीर करत थेट बदलापूर शहरात पाट्या हातात घेत पोस्टरच झालकवले आहेत.
नेमके काय म्हणाल्या बांगलादेशी घुसखोरांबद्दल मनसेच्या संगीता चेंदवणकर ?
बांगलादेशी यांची माहिती देणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापूरकडून मिळणार बक्षीस…..
बदलापूर शहराच्या आजूबाजूच्या शहरामध्ये सातत्याने बेकायदा वास्तव्य करणारे बांगलादेशीना अटक केली जात आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापूर शहराच्यावतीने बांगलादेशियांची माहिती देणाऱ्याला १ हजार रुपयांची रोख रक्कम बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहे. शिवाय ही माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल .आपल्या देशामध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी यांचे प्रमाण वाढलं असून त्यामुळे राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. म्हणून मनसेने बदलापूर शहरात बांगलादेशियांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. बदलापूर शहरातील व्यापारी, दुकानदार, नागरिक सगळ्यांनाच त्या बांगलादेशींना शोधून काढण्यासाठी पोलिसांची मदत व्हावी.या हेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे…..(महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापूर) आशा आशयाची पोस्ट त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेयर करत अनोखा उपक्रम राबला आहे.
कोण आहेत मनसेच्या संगीता चेंदवणकर ?
संगीता चेंदवणकर ह्या निर्भया सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदलापूर च्या शहर अध्यक्ष असून नेहमी कोणत्या न कोणत्या आंदोलनामुळे त्या चर्चेत असतात. बदलापूर शहरात एक शाळेत चिमूकलीवर झालेल्या अत्याचारच्या निषेधार्थ त्यांनी संपूर्ण बदलापूर शहर बंद करत तत्काळ आरोपीला अटक करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले होते त्याचबरोबर त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदलापूर विधानसभेच्या उमेदवार देखील होत्या.
