Mns sangli morcha मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
Published by news24tas
सांगली :-जिल्ह्यात अवैध धंदे सुरु आहेत,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरी, मारामारी, खुनाच्या घटनांसह अवैध धंदे वाढले आहेत. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग वाढत आहे. नशेच्या गोळ्या, गांजाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत, अन्यथा कायदा हातात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे अवैध धंदे उद्ध्वस्त करणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी मनसेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मनसेच्यावतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकान्यांना देण्यात आले.
मोर्चावेळी मनसेच्या वतीने विविध मागण्या केल्या गेल्या आहे.
यावेळी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, भेसळयुक्त खते, औषधे यांची जिल्ह्यात सर्रास विक्री सुरु आहे. खते, औषधे विक्री करणाऱ्या आस्थापनांची चौकशी करावी, दोषी आस्थापनांचा परवाना निलंबित करावा, बांधकाम कामगारांची सर्व कामगार सुविधा केंद्रे बंद करावीत. पूर्वीप्रमाणे बांधकाम कामगारांना स्वतःची नोंदणी स्वतः करता यावी यासाठी संगणक प्रणाली खुली करावी. अन्न व औषधात देखील अनेक रुग्णालयात रुग्णांची लूट जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलकडून करण्यात येत आहे. अनेकदा दोषयुक्त सुविधा दिल्या जात आहे. रुग्णांची लूट सुरु आहे. रुग्णांकडून प्रमाणापेक्षा जास्त बिलाची आकारणी करत आहेत. अनेक रुग्णालयात प्रमाणापेक्षा जास्त बिलांची आकारणी केली जात आहे. नियम पायदळी तुडवून व्यवसाय करणाऱ्या अशा रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करावी करावी, अशी मागणी मनसेच्यावतीने केली आहे
प्रशासनाने बेकरी पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल उत्पादन व पंकिंग करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करावी व सदोष आस्थापनांवर कायदेशीर कारवाई कराची, यासह अन्य अनेक मागण्या मनसेच्यावतीने केल्या आहेत. मंगळवारी सकाळी मनसेच्या विश्रामबाग कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या मोर्चामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, शहराध्यक्ष सुरेश टेंगले, अविनाश जाधव, सत्यवान पिंजारी, स्वप्नील शिंदे, रोहित घुबडे-पाटील, प्रमोद सरगर, अमित पाटील, प्रकाश माळी, भगिरथ राठोड, विठ्ठल शिंगाडे, सचिन खराडे, अमर औरादे, सरोजिनी लोहगावे, मोनिका भंडारे, जयश्री यमगर, धनंजय शिंदे, संजय पाटील, प्रकाश साळुंखे, उदय पाटील, प्रकाश गायकवाड, सागर सुतार, विशाल शिंदे, कुमार जाधव, संजय पाटील यांच्यासह मनसे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
