मनसेची पालिकेची मोर्चा बांधणी सुरू मोठे फेरबदल सुरू!

पालिका निवडणुकीपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होणार मोठे फेरबदल?

News published by News24tas

पुणे:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेत झालेला दारूण पराभव बाजूला सरत मनसेने आता पुन्हा धूळ झटकून पालिका निवडणूकीत मोठ्या ताकतीने उतरायचे ठरवले असेच दिसत आहे त्यामुळे आगामी काळात पक्षात मोठे फेरबदल होणार का ? पूर्ण पदे बरखास्त करून पुन्हा एकदा पक्ष बांधणी केली जाणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना राज ठाकरे यांनी पदनियुक्ती करून पडलेल्या प्रश्नाचे एक प्रकारे उत्तरच दिले आहे.

पालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मनसेत पूर्णबांधणी.

पुण्यात मनसेत पूर्णबांधणी करत अमित ठाकरे यांनी एक पत्रक काढत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. यावेळी पत्रकात म्हणले आहे की,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुढील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, ‘महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना’ अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी साझ्यासोबत तुम्ही सर्वजणही झपाटून काम कराल.

पालिका

 श्री. महेश भोईबार 

शहर अध्यक्ष (कार्यक्षेत्र हडपसर, पर्वती, खडकवासला व वहगांव शेरी )

श्री. धनंजय विजय दळवी

शहर अध्यक्ष (नव कसबा, कॅन्टोन्मेंट, कोथरुड व छत्रपती शिवाजीनगर विधानसभा)

हाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील तुम्हा सर्वांच्या भावी वाटचालीला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा या शब्दात शुभेच्छा देत पद नियुक्ती करण्यात आली.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या