मनसेच्या याचिकेमुळे कोर्टाकडून कानउघाडणी.

मनसेचे संदीप पाचांगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर कोर्टाकडून महानगर पालिकेची कानउघाडणी.

मुंबई:– महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस श्री. संदीप पाचंगे यांनी अवैध होर्डिंग या विषयांत जनहित याचिका दाखल केली होती. मे २०२४ मध्ये घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून अनेकांचा मृत्यू झाला, वित्तहानी झाली. पुढे काही काळ या विषयावर चर्चा सुरु राहिली पण पुढे कुठल्याही महापालिकेच्या अखत्यारीत अवैध होर्डिंग्सवर कारवाई केली गेली नाही. या विषयात नक्की ठाणे महापालिकेने देखील फार काही कारवाई करत अवैध होर्डिंग्स हटवली आहेत असं घडलं नाही. याबाबत श्री. संदीप पाचंगे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असता त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने एकूणच प्रशासनाला काही महत्वाचे प्रश्न विचारले व कानउघडणी केली.

१) अवैध होर्डिंग्स उभारली जाऊ नयेत म्हणून काय कारवाई केली जाते ?

२) अवैध होर्डिंग उभारलं गेलंच तर फौजदारी आणि दिवाणी कारवाई काय स्वरूपात केली जाते ?

मनसे

या विषयावर पुढील सुनावणी २९ जानेवारी २०२५ रोजी होईल. पण यानिमित्ताने माननीय न्यायालयाने प्रशासनाला आता कारवाईस भाग पाडावे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून म्हणण्यात आले.

सदरील दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले होते.(मनसे)

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता तर होर्डिंगखाली अडकलेले 88 जण जखमी झाले होते . घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे अनधिकृत जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर मे २०२४ ला कोसळले होते.या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते.

घाटकोपर होल्डींग प्रकरणात संचालिकेला जामीन -वाचा संपुर्ण

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या