राज ठाकरेयांच्यावर विश्वास ठेवत शेकडो तरुणांनी घेतला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश मनसेत पुन्हा इन्कमिंग.
सांगली:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेत दारूण पराभव झाल्यानंतर मनसेला पुन्हा गळती लागेल असे अनेकांना वाटते परंतु तरुणांचा राज ठाकरे यांच्यावर असलेला विश्वास व राजकारणात काम करण्याची इच्छा पाहता मनसेत अनेक तरुणांनी प्रवेश घेत मनसेचा झेंडा हाती घेतला आहे त्यामुळे आता मनसेत पुन्हा एकदा जोरदार मनसेत इन्कमिंग सुरू झाली.
इन्कमिंग नंतर मनसे पदाधिकारी पुन्हा कामाला.
विधानसभेत मिळालेले अपयश बाजूला सारत मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा एकदा नव्या जोशाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय सांगली जिल्ह्यात आला असून राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत शेकडो तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
सर्वसाधारणपणे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये नवीन प्रवेश होत असतात. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर देखील प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे. सांगलीत पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आणि राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. नुकतेच प्रविष्ट झालेल्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचं मनापासून स्वागत या शब्दात मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
