शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात! मनसेमुळे झाला शेतकऱ्यांचा फायदा.
News published by News24tas
सांगली:-जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना विकले जाणारे पीडीएम पोटॅश खत हे कमी दर्जाचे आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने केली.यासाठी मनसेने मोठ्या संख्येत उपस्थित राहून एक मोर्चा देखील काढला होता त्याच मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले.
मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा कृषी अधीक्षक यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कृषी विभागाने जिल्ह्यातील भेसळयुक्त खते व औषध विक्री आणि उत्पादन करणाऱ्या दुकाने व कंपन्यांची चौकशी करून कारवाई केल्याबद्दल स्वागत केले.
कृषी विभागाने केलेली कार्यवाही कौतुकास्पद आहे-मनसे
यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत म्हणाले, कृषी विभागाने केलेली कार्यवाही कौतुकास्पद आहे. परंत जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना विकले जाणान पीडीएम पोटॅश खत हे कमी दर्जाचे आहे त्यामध्ये पोटॅश हा घटक १४.५ टक्के असणे आवश्यक आहे. अनेक कंपन्यांच्या खतामध्ये पोटॅश अत्यंत कमी प्रमाणात आढळून येत आहे. यावेळी मनसे पदाधिकारी सरोज लोहगावे, श्रीधर करडे, सुरेश टेंगले विठ्ठल शिंगाडे, प्रकाश साळुंखे, रोहित घुबडे, अमित पाटील, प्रकाश माळी स्वप्निल शिंदे उपस्थित होते.
