शालेय मुलींची छेड काढणाऱ्या पठाण विरोधात मनसे आक्रमक.
News published by news24tas
पुणे:– शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अनेक गैरप्रकार घडताना बघायला मिळत आहे.पुण्यातील एक शाळेच्या व्हॅन चालकाने मुलींसोबत गैरप्रकार केल्याचे समोर आले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावरून आक्रमक झाली असल्याचे पहिला मिळत आहे.संबंधित चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेने केली आहे.
यावेळी निवेदन देताना मनविसे पुणे शहर अध्यक्ष महेश भोईबार म्हणले की, पुण्याला शिक्षणाचे माहेर घर म्हणून संपुर्ण जगभरात ओळखले जाते. पुणे शहरामध्ये परराज्यातून शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात. अलीकडच्या काळात पुणे शहरात शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आढळत आहेत. स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेच्या मुनोत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, गोकुळनगर कात्रज पुणे ४६ या शाळेचे MH14CX8011 या व्हॅनचे चालक कयुम पठाण याने शालेय विद्यार्थीनींवर चुकीचा स्पर्श करणे, त्यांना मेसेज करणे व त्यांना विविध आमिष दाखवत स्वतः सोवत एकांतात जाण्यासाठी विनंती करण्यासाखे गैरप्रकार सुरू केले आहेत. अतिशय विश्वास ठेवत विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या मुलांना या व्हॅन चालकांसोबत शाळेत शिक्षणासाठी पाठवत असतात. त्या विश्वासाचा भंग करत इतक्या खालच्या पातळीला जाऊन व्हॅन चालकाकडून होणारा गैरप्रकार मनाला वेदना देणारा आहे. यासंपुर्ण प्रकारामध्ये शालेय प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. गेल्या अनेक वर्षापासून सदर वाहन विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याची व्यवस्था करित आहे. जेव्हा एखादे वाहन अशापद्धतीची व्यवस्था विद्यार्थ्यांना पुरवते त्यावेळेस शाळा प्रशासनाच्या माध्यमातून त्या वाहनास शालेय परवाना दिला जातो. परंतु सदर वाहन हे खाजगी असून सुद्धा या वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतुक करण्यात येत होती. या वाहनाचा चालक याची पोलिस पडताळणी झालेली नाही. प्रत्येक शाळेला असे गैरप्रकार टाळण्यासाठी शालेय रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करणे बंधनकारक असते ती स्थापना सदर शाळा प्रशासनाने केलेली नाही.
तरी सदर वाहन चालक कयुम पठाण याच्यामार्फत केवळ १ नाही तर अशा व-याच विद्यार्थीनींसोबत गैरप्रकार केल्याची दाट शक्यता आहे. सदर प्रकरणात शाळा प्रशासन विद्यार्थीनींच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तरी सदर विषयामध्ये सखोल चौकशी करून वाहन चालकासोवत शाळा प्रशासनावरही गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती.
मनसेने निवेदन देत घेतली आक्रमक भूमिका.
मुंबई महाराष्ट्रात की परप्रांतात वाचा सविस्तर .
महायुतीचे खाते वाटप जाहीर वाचा सविस्तर .
