आरोप प्रत्यारोप करत अनेक नेत्यांनी मुंढे यांना चांगलच घेरले पण बाकी नेत्यांचे काय?
News published by News24tas
महाराष्ट्रात सध्या फक्त एकच मुद्दा गाजतोय तो म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा त्यांच्या मारेकऱ्यांना अटक कधी होणार व मुख्य सूत्रधार कधी पकडणार यावरून सत्तेतील नेते विरोधी नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी चांगलेच रान पेटवले आहे व या सर्वांना खत पाणी देण्याचे काम धनंजय मुंढे यांनी केले असे म्हणत त्यांच्या राजीनाम्याचे मागणी देखील अनेकांनी केली.
मुंढे फक्त एकटे नाहीत सर्वांचेच चेले चपाटे मस्तीत.
गुन्हेगार व गुन्हेगारीला खत पाणी घालण्याचे काम धनंजय मुंढे यांनी बीडमध्ये केले असे अनेकांचे म्हणणे आहे पण खतपाणी घालणारे मुंढे एकटे नेते नाहीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक नेत्याचा मग तो सत्तेत असो की विरोधात १००% एक ना एक तरी भाई असतोच. जो त्यांचे काळे कामे हाताळत असतो महाराष्ट्रात तर हा ट्रेंड वाढतच चालला आहे.आधी गुन्हेगारांना राजकीय पाठबळ द्यायचे नंतर त्यांच्याकडून त्यांच्यामाध्यमातून आपले व्यवसाय चालवायचे हेच सध्याअनेक ठिकाणी महाराष्ट्रात चालू आहे.
त्यामुळे एकट्या धनंजय मुंढेयांना फक्त राजकीय स्वार्थासाठी टार्गेट करणे म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि लोकांचे पाहायचे वाकून असेच काहीसे झाले आहे.याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर मुंढे यांच्यावर तोंडसुख घेणारे जितेंद्र आव्हाडच कारण आव्हाडांनी तर टिका केली म्हणून अनेकांना आपल्या बंगल्यावर नेऊन मारले आहे. एवढेच काय काही दिवसाअगोदर मांडीला मांडी लावून जेव्हा मुंढे जितेंद्र आव्हाड मुंढे यांच्या सोबत राष्ट्रवादीत काम करायचे तेव्हा न्हवती का मुंढेची बीडमधे दहशत तेव्हा न्हवते का वाल्मीक कराड तेव्हा मात्र तुम्ही काहीच बोलला नाहीत असो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न परंतु कोणी तरी पुढे येऊन सर्वच राजकीय नेते व त्यांच्या चेल्या चपाट्यावर बोलले पाहिजे तेव्हाच कुठे या महाराष्ट्रात शांतता राहील नाही तर आज बीडमध्ये घडले उद्या आणखी कुठे घडेल.
राजकीय नेत्यांनी सुद्धा राजकीय व आर्थिक फायद्यासाठी आता गुन्हेगारांना पाठीशी घालने बंद करावे व जनतेचे प्रश्न सोडवण्यावर जास्त लक्ष द्यावे हीच अपेक्षा व विनंती…
बीड पोलीस चौकीतच हल्ला वाचा पूर्ण बातमी.
