मुंबई महाराष्ट्रात की परप्रांतात?

मुंबई

मुंबई महाराष्ट्रात की परप्रांतात ? असा सवाल आता मागील काही दिवसांच्या घटना बघून अनेकांना पडत असेल.

News published by news24tas

 

मुंबई हे तसे मराठी भाषिकांचे शहर मराठी बहुल असलेल्या या शहरात व शहरालगतच्या अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषिकांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे मुंबई शहर नेमके महाराष्ट्रात आहे की परप्रांतात असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत. मुंबईत अनेक अशा घटना घडताना दिसत आहेत ज्यात मराठी माणसांवर अन्याय अत्याचार होत आहे काही दिवसा आधी एका महिलेला मारवाडी भाषेत बोलायची केलेली जबरदस्ती, शुक्ला नमाक व्यक्तीने केलेला जीवघेणा हल्ला असो की काल ठाण्यात महिला रिक्षचालकावर केलेला हल्ला या घटना जरी वेगवेगळया असल्या तरी थांबायचं काही नाव घ्यायला तयार नाहीत रोज कुठे ना कुठे मराठी माणसाची गळचेपी होत असून अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे.

मुंबई मध्ये पुन्हा एकदा परप्रांतीय व्यक्तीने एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

कल्याण मध्ये पुन्हा एकदा परप्रांतीय व्यक्तीने एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. उत्तम पांडे (वय 40) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला पांडे व त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

याघटनेत पीडित मुलीचे वडील, आई व आजी जखमी झाले आहेत. मुलीचे वडील हे मुंबई पोलिस दलात कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली असून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात उत्तम पांडे व त्याची पत्नी रिना पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघाना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे.

वडिलांनी पांडे याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला यावेळी पांडे याने तिच्या वडिलांशी वाद घालण्यास सुरुवात करत मारहाण केली. पीडित मुलीच्या आजीने मुलीच्या आईला हे सांगताच ती देखील घरी आली. तिला सगळा प्रकार समजताच तिने जाब विचारताच पांडे याची पत्नी रिना हिने मुलीची आई व आजीला मारहाण केली.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या