राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार की ठाकरे ब्रँड संपणार?
news published by news24tas
मुंबई:- मुंबई जशी महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे.त्याच प्रमाणे ठाकरे आणि महाराष्ट्र हा देखील एक अविभाज्य भाग.अर्थातच बोलण्याचा उद्देश एवढाच की ठाकरे आडनावा शिवाय गेली अनेक दशके महाराष्ट्राचे राजकारण ना चालू झाले ना संपले परंतु पुढच्या येणाऱ्या दशकांचे काय असा प्रश्न आता कार्यकर्त्यांसह कदाचित ठाकरेंना देखील पडतच असेल बहुतेक..
त्याला कारण देखील तसेच बाळासाहेब ठाकरेंपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री झालेल्या ठाकरे ब्रँडची एक वेगळीच ओळख देशासह संपूर्ण महाराष्ट्रात होती. बाळासाहेबांना अनेक जण त्यांच्या निर्णय पद्धतीमुळे प्रति मंत्रालय किंवा रिमोट कंट्रोल असे म्हणत. त्याला कारण देखील तसेच असायचे सत्ता असो किंवा नसो मातोश्रीवर जर एकदा निर्णय झाला तर तो महाराष्ट्र सरकारला देखील मान्य करावा लागत.पुढे जसा जसा काळ गेला त्या काळाबरोबर रिमोट कंट्रोल देखील दोन झाली राज ठाकरेंनी आपली वेगळी चूल मांडली व अनेक निर्णय आता मातोश्री सह राज ठाकरेंच्या निवासस्थानी देखील होऊ लागली बाळासाहेबांच्या निधनानंतर देखील हा वारसा दोन्ही ठाकरे बंधूंनी चालवला परंतु मध्यंतरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.
शिंदेंनी शिवसेनेचे चिन्ह व नाव मिळवले,तर राज ठाकरेंच्या मनसेचा एकही आमदार विधानसभेत उरला नाही व उद्धव ठाकरेंच्या आमदारांची संख्या देखील बोटांवर मोजण्या इतकीच उरली आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँड संपतो की काय असे प्रश्न आता कार्यकर्त्यांसह नेत्यानं पडू लागलेत.त्याला कारण देखील तसेच सध्या ठाकरेंची स्थिती राज ठाकरेंच्याच भाषेत सांगायची तर ‘कोणी पण उठतो आणि टपली मारून जातो’ अशी झाली आहे. जे आठवले शिवसेने बरोबर उध्दव ठाकरेंबरोबर महायुतीत होते ते आता खोचक शब्दात ठाकरेंवर टीका करत सुटलेत.
ठाकरे बंधूंबद्दल काय म्हणाले रामदास आठवले ?
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कधीही एकत्र येणार नाहीत. दोघे एकत्र आले तरी महायुतीला फटका बसणार नाही. कारण दोघांचेही राजकारण संपलेले आहे अशा शब्दात रामदास आठवले यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना टार्गेट केले असून आता दोन्ही ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात व आगामी काळात ठाकरे एकत्र येऊन पुन्हा तोच दरारा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण करतात का पाहावे लागेल.
