राज ठाकरेंची खरी ताकद कोल्हापुरातून पायी चालत मुंबईला जाणार!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याची कोल्हापूर ते मुंबई पदयात्रा!

News published by News24tas

मुंबई:– ना आमदार ना खासदार ना कोणत्या महानगर पालिकेत सत्तेत तरी देखील राज ठाकरे अनेक वर्षांपासून पराभव पचवता राज्याच्या राजकारणात आपले अढळ स्थान राखून आहेत. कितीही नेते राज ठाकरेंना राम राम करत इतर पक्षात गेली तरी देखील मनसेचा कार्यकर्ता मात्र कधी फुटत नाही. इतक्या पराभवानंतर देखील तो नेहमीच राज ठाकरेंसोबतच दिसतो. आणि राज ठाकरे देखील त्यांच्या प्रत्येक भाषणात तुम्ही कार्यकर्ते आहात म्हणून राज ठाकरे आहे असे आवर्जून सांगतात. थोडक्यात काय तर राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राज्य जरी नसले केली तरी लाखो तरुणांच्या मनावर आज देखील राज ठाकरेंचे राज्य आहेच. असाच एक राज वेडा  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता थेट कोल्हापूर ते मुंबई पाई चालत येतोय.

 

राज ठाकरेंसाठी पाई चालत येणारा तरुण कोण?

कोपरगावात राहणारा प्रमोद अर्ने थेट कोल्हापुरातून राज ठाकरेंसाठी पाई चालत मुंबईत येणार असून तो येत्या मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या एक दिवस अगोदर मुंबईत दाखल होणार असून त्या दिवशी राज ठाकरे स्वतः त्याची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आगामी निवडणुकीत यश मिळावे,पक्षाचे वैभव वाढावे व राज ठाकरेंचे स्वप्न पूर्ण व्हावे हा संकल्प घेऊन प्रमोद कोल्हापुरात देवीच्या चरणी पाया पडत थेट मुंबईला निघाला.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या