राज ठाकरेंची भेट आणि छावा चित्रपटातील तो भाग कट.

वादाच्या बोवऱ्यात सापडल्या नंतर छावा चित्रपटातील तो भाग कट करण्याचा दिग्दर्शकांचा निर्णय.

news published by news24tas 

मुंबई:-अनेक दिवसापासून बहुप्रतीक्षित असलेला संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चिटपटचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला परंतु ट्रेलेर प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच या ट्रेलेरमुळे मोठा वाद निर्माण झाला व अनेक संघटना व शिव-शंभू प्रेमिनी या ट्रेलेरवर आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त करत चित्रपटातील काही भाग काढून टाकण्याची मागणी केली होती.

छावा चित्रपटा संदर्भात राज ठाकरेंशी चर्चा.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सर्व वादानंतर राज ठाकरे यांच्याशी छावा चित्रपटा संदर्भात चर्चा केली व म्हणले की, राज ठाकरे यांचे शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या विषयी वाचन खूप चांगले आहे. अनेक इतिहासिक संदर्भ देखील त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी चित्रपटात नेमके काय बदल केले पाहिजे मी त्यांच्याकडून जाणून घेतले व त्यांनी देखिल ते दृश्य काढून टाकण्याच्या सूचना केल्या व खूप चंगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्याबद्दल राज साहेबांचे खूप खूप धन्यवाद.

छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची प्रतिक्रिया.

छावा
https://news24tas.com/

छावा चित्रपटाले काही सीन डिलीट होणार का यावर विचारले असता लक्ष्मण उतेकर म्हणाले की, लेझिम खेळतानाची दृष्य आम्ही डिलीट करणार आहोत आणि राज ठाकरे यांनी देखील मला तोच सल्ला दिला आहे. यामागे कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश न्हावता अप्रत्यक्षपणे जर यामुळे कोणाच्या भावना यामुळे दुखणार असतील तर आम्ही तो सीन डिलीट करणार कारण तो सीन चित्रपटाचा मोठा भाग नाहीये तो नक्कीच डिलीट केला जाइल.

छत्रपती शिवाजी महाराज काय होते ही संपूर्ण जगाला कळावे याच उद्देशाने हा चित्रपट बनवला आहे. आम्ही गेल्या ४ वर्षापासून हा चित्रपट बनवत आहोत, त्यामुळे काही १ -२ सीन मुळे त्याला गालबोट लागणार असेल तर ते सीन डिलीट करायला आम्हाला काहीच हरकत नाही असे उतेकर म्हणाले.

दरम्यान ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी ला सर्व भारतभर प्रदर्शित होणार असून यामध्ये संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल असून दाक्षिणात्य अभिनेत्री राशमीका मांदना व अभिनेता अक्षय खन्ना असे कलाकार झळकणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटी, सूव्रत जोशी इत्यादी मराठी कलाकार देखील दिसणार आहेत.

Jalna:- जालन्याचे पहिले महापौर कोण?

प्रशासनाकडून २६ जानेवारीच्या कार्यक्रमाबाबत मोठी चुकी.

Home

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या