राज ठाकरेंच्या मनसेने कानाखाली काढलेल्या आवाजाचे पडसाद संसदेत उमटले .

हिंदी भाषिकांना संरक्षण देण्याची खासदार वर्मा यांची मागणी.

news published by news24tas

मुंबई:-राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत अनेक विषयांवर भाष्य केले पण त्यात दोन मुख्य मुद्दे होते ते म्हणजे औरागजेबाची कबर आणि दुसरा म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषेत बोल म्हणण्यावर नहीं आती म्हणण्याच्या कानाखाली बसणारच असे राज ठाकरे म्हणाले आणि मनसे कार्यकर्ते कामाला लागले. सभेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सर्व महाराष्ट्रभर मनसे कार्यकर्त्यांनी बँकांना निवेदन दिले की तुमच्या येथे मराठी भाषेचा वापर करा त्यावेळी अनेक ठिकाणी हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांशी मनसे पदाधिकाऱ्यांची बाचाबाची झाली तर काही ठिकाणी कानाखाली आवाज देखील काढण्यात आला. आता त्याच आवाजाचे पडसाद थेट संसदेत उमटले असून यामुळे मनसे विरूद्ध परप्रांतिय नेते असा वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अस्तित्व के लडाई के लिये मनसे ये सब करती हैं!- राजेश वर्मा.

राज ठाकरें विरोधात बोलताना बिहारचे खासदार राजेश वर्मा यांनी राज ठाकरेंवर या टीका केली असून मनसे अस्तिव के लडाई के लिये ये सब करती असे म्हणले असून राज्य सरकारने हिंदी भाषिकांना मनसे पासून संरक्षण द्यावे असे देखील ते म्हणले आहे.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या