राज्यातील दोन मोठ्या नेत्यांची भेट व संजय राऊत यांची राज ठाकरेंवर बोचरी टिका!
NEWS PUBLISHED BY NEWS24TAS
मुंबई:- आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या असून अनेक तर्क वितर्क या भेटीमुळे लावले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पहिल्यांदाच गेले असून या भेटीमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे- भाजप येणाऱ्या पालिका निवडणुकीत एकत्र येणार की अमित ठाकरे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळणार असे अनेक तर्क या भेटीतून लावले जात असून आगामी काळात नेमके भाजप-मनसे मैत्री वाढते की तुटते हे पहावे लागेल.
संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर टिका.
दरम्यान या भेटीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे एक कॅफे उघडला होता एवढेच मला माहिती आहे. तिथे काही लोक सातत्याने चहापाण्यासाठी जात असतात आणि तो सर्वासाठी खुला आहे. किंबहुना राजकारणातली ही चांगली गोष्ट असून चहापान होत असतात. चांगला कॅफे असला तर लोक येत असतात त्यांना चांगला नजारा बघायला मिळतो बसायला उत्तम जागा मिळते, असा टोला शिवसेना उठबा गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
सुषमा अंधारे यांची देखील राज ठाकरे यांच्यावर टिका
सदरील भेटीवर शिवसेना उठबा गटाने जोरदार टिका केली असून राज ठाकरे यांची राजकीय पावर संपत चाललीये अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. राज ठाकरे कोणावर बोलतात आणि त्यांचाकडे कोण जात, आता फारसं महत्त्व राहिलेलं नाही. महाराष्ट्रातील जनतेला व मनसेच्या कार्यकर्त्यांना ही बाब माहिती झाली अनेकदा राज ठाकरे हे भाजप विरोधात भूमिका घेतात ज्यावेळी निवडणूका येतात त्यावेळी ते भाजपशी जवळीक साधताना दिसतात. त्यामुळे ही भेट महापालिका निवडणुकीसाठी असू शकते, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
