राज ठाकरे व सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मृती स्मारकाचे अनावरण.
news published by news24tas
मुंबई:-क्रिकेट ची बाराखडी शिकवणाऱ्या द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सार यांच्या कार्याचा गौरव शिवाजी पार्क येथील स्मृती स्मारकाच्या अनावरणात केला गेला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्रिकेटपटूंनी यश मिळवून आपले स्वप्न साकार केले.
सचिन तेंडुलकर घडला तो सुद्धा रमाकांत आचरेकर सरांच्या प्रशिक्षणामुळेच, सचिन तेंडुलकर सोबतच आचरेकर सरांनी प्रविण आमरे, अजित आगरकर, संजय बांगर आणि रमेश पोवार अशा अनेक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थितीच द्रोणाचार्य आचरेकर यांचा वारसा सांगून जाते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेही उपस्थित होते.
विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांचे भाषण.
राज ठाकरे व सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मृती स्मारकाचे अनावरण करण्यात आले त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की,क्रिकेट जसं बदलत गेलं, तसं आमच्याकडं राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे थर्ड अंपायर असतो. निवडणुकीला आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता, तर अनेक निर्णय कदाचित वेगळ दिसले असते. मात्र, आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्यामुळे आम्ही काही करु शकत नाही.
मला खरं तर इथे पुतळा नको होता आपल्या कडे पुतळ्यांची कमतरता नाहीच त्यामुळे इथे मला काही तरी वेगळ करावं अशी माझी इच्छा होती आचरेकर सरांची जी आयडेंटिटी आहे त्यांची टोपी , बॅट त्याची कलाकृतीचे इथे अनावरण करण्यात आले तुम्ही नक्की बघा.
काय म्हणाले सचिन तेंडुकर
रमाकांत आचरेकर सरांनी कधीच वेल प्लेड म्हटलं नव्हतं. आम्ही चुका सुधारु शकलो तर पुढं जाऊन काही तरु करु शकतो, असा विचार ते करायचे, असं सचिन तेंडुलकरनं म्हटलं. यावेळी सचिन तेंडुलकरनं रमाकांत आचरेकर सरांच्या इतर आठवणी सांगितल्या.
#Raj_Thackeray, #raj_Thackeray_latest,
