एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची कारण अद्याप अस्पष्ट.
News published by news24tas
मुंबई:– राज ठाकरे यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या शिवतीर्थ या दादर येथील निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी महानगर पालिका निवडणुकी संदर्भात या भेटीत काही चर्चा झाल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.त्यामुळे आता मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महायुतीत सामील होते की पुन्हा एकदा एकला चलो रे चा नारा राज ठाकरे देतात हे पहावे लागेल.
भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ! सामंत मात्र आनंदी.
राज ठाकरे यांची अशी अचानकपणे एकनाथ शिंदे यांनी भेट का घेतली यामुळे अनेक चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून महायुतीत जर राज ठाकरे सामील झाले तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.तर अनेक नेत्याच्या आता यावर प्रतिक्रीया यायच्या बाकी आहेत त्यामुळे रात्री झालेल्या या भेटीमुळे उद्या सकाळी राजकारणात काय पडसाद उमटतात हे पाहावे लागेल.
