राहुल यांनी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेकांच्या तीव्र प्रतिक्रिया.
News published by News24tas
महाराष्ट्र:- राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर खासदार उदयनराजे भोसले कडाडले आहे. ते म्हणाले,”राहुल सोलापूरकर यांनी केलेल्कला माफी नाही. शिवरायांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. राहुल सोलापूरकर ही औरंगजेबाची औलाद आहे. अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे. सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे”
राहुल सोलापूरकारचे वादग्रस्त वक्तव्य काय?
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मराठमोळे वाचाळवीर अभिनेते राहुल सोलापूरकर अडचणीत आले आहेत. राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याचा राजकीय पक्षांकडून निषेध केला जात आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये आजवर अनेक भूमिका साकारून ओळख कमावलेले अभिनेते राहुल सोलापूरकर त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी महाराजांनी स्वतःची आग्र्यातील कैदेतून केलेली सुटका ही लाच देऊन केली होती असा उल्लेख केला आहे. यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतेय.
राहुल विरुद्ध अमोल मिटकरीयांची राज्यपालांकडे मागणी.
राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी राज्यपालांकडे केली आहे.
