विधानसभेनंतर मनसे विरुद्ध परप्रांतिय वाद पुन्हा पेटणार?

विधानसभेनंतर मनसे विरुद्ध परप्रांतिय वाद पुन्हा पेटणार? मनसे पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा परप्रांतियाला केली मारहाण.

News published by News24tas

मुलुंड:- विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाले व प्रादेशिक पक्षांना अपयश ज्यात शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा पक्षांना महायुतीच्या यशाचा मोठा फटका बसला. व विधानसभा निकालानंतर अवघ्या काही दिवसातच हिंदुत्वाच्या मुद्यावरून मतदान केलेल्या मतदारांची मुंबईसह अनेक ठिकाणी कशा प्रकारे गळचेपी होत आहे हे देखील मनसे व शिवसेनेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा समोर आणले.
मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत झालेली मराठी माणसाला मारहाण असो की ठाण्यात महिला रिक्षचालकाला परप्रांतिय सुरक्षा रक्षकाने केलेली आरे वारी असो अशा अनेक घटना समोर येत आहे व मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे देखील अनेक कार्यकर्ते व नागरिक व्यक्त होताना दिसत आहे आता आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र येतात की नाही ही तर चर्चेची बाब आहे परंतु मराठी माणसाची गळचेपी व मराठी विरुद्ध परप्रांतिय हा वाद काही केल्या थांबता थांबेना असेच दिसत आहे.

मनसे

त्यातच आता अजून एक प्रकरण मुंबई भागातून समोर येत असून एका हॉटेल मध्ये एका मराठी मुलीला एका परप्रांतिय कामगाराने आरे वरीची भाषा करत तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केलयची घटना समोर आली असून याप्रकरणी माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जात त्या परप्रांतीय कामगाराला चांगलाच चोप दिला व सदरील मुलीची व कुटुंबाची माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ प्रसारित केला असून आता यावर पुन्हा काय वाद पेटतो हे पाहावे लागेल.यावेळी मनसेचे शाखा अध्यक्ष संदीप वरे हे देखील उपस्थित होते.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

हॉटेलमध्ये काम करणारा एक मुलगा ते एन्काऊंटर स्पेालिस्ट.

 

पालकमंत्र्यांची यादी जाहीर बीड,जालना वेगळाच निर्णय.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या