पीकविमा संदर्भात कृषिमंत्री यांचे वादग्रस्त वक्तव्य.
News published by News24tas
राज्य सरकारकडून एक रुपया किमतीत शेतकऱ्यांना पीक विमा उपलब्ध केला जातो परंतु याच पीक विमा संदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असून यावरून आता नवीन बाद निर्माण होत असून अनेकांकडून या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जातोय तर सोशल मिडिया वर देखील शेतकरी वर्ग तसेच नेटकरी यांनी देखील कृषिमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला असून अशी उपकाराची भाषा का? म्हणत सवाल उपस्थित केले आहेत.pik
पीकविम्या संदर्भात काय म्हणाले कृषी मंत्री?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की,आज काल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही परंतु आम्ही शासनाकडून एक रुपया मध्ये पीक विमा देतो याचा अनेक जण गैरफायदा देखील घेतात अनेक इतर राज्यातील लोकांनी देखील याचा याचा फायदा घेतला असून खूप सारे अर्ज यामुळे फोफावले आहेत असे कृषिमंत्री म्हणाले.
सुषमा अंधारे यांचा कृषी मंत्र्यांवर निशाणा.
ईव्हीएम च्या कृपेमुळे निवडून आलेले लोक शेतकऱ्यांना भिकारी म्हणून संबोधत आहेत,जर शेतकऱ्यांची तुलना शेतकऱ्यांशी तुम्ही करत असाल तर नेत्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे असे म्हणत सुषमा अंधारे यांनी सदरील वक्तव्याचा निषेध केला आहे.
