संकटावर मात करत वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश.
News published by News24tas
बीड:- संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती व त्यांच्या कुटुंबावर अचानकपणे एवढे मोठे संकट आले. कुटुंबाचा आधार हरवला तरी देखील संतोष देशमुख यांच्या कन्येने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिचे सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे. आलेल्या संकटाला मात देत लेकीने मिळवलेल्या यशामुळे संतोष देशमुख यांना देखील निश्चितपणे आनंद झालाच असेल परंतु झालेली घटना ही खूपच दुर्दैवी होती व आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा झाली पाहिजे अशीही प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत.मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या कु.वैभवी देशमुख यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत संकटावर मात करून इयत्ता १२वी च्या परीक्षेत ८५.३३ % गुण प्राप्त केले आहेत. याबद्दल कु.वैभवी देशमुख यांचे मन:पुर्वक अभिनंदन. त्यांचे हे यश अनेकांना प्रेरणादायी आहे.
सुप्रिया सुळे यांनी फोनवरून वैभवीला मिळालेल्या यशाच्या दिल्या शुभेच्छा.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी देखील या कठीण परिस्थितीवर मात करत वैभविने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी वैभवी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलतांना भाऊक झाली होती व तिने तुम्हा एकदा न्यायची मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.
जालन्याची बीडकडे वाटचाल ! वाळू माफियांच्या भाईगिरीला आळा घालावा – रवि राऊत.
शिवसेना (उबाठा) ने तोडफोड करण्याचा इशारा देताच मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात
जालन्यात धक्कादायक प्रकार उघडकीस! माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकी
