झुकेगा मै… शिंदेंवर शिवसेनेची टीका.
News published by news24tas
पुष्पा आला नंतर पुष्पा चा भाग दोन देखील आला लक्षात राहिला तो पुष्पा मधला ‘ मै झुकेगा नही साला ‘ हा सुपरहिट डायलॉग.आज अचानक पुष्पा चित्रपटाची आठवण काढण्या मागचे कारण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यावर मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकात केलेली टिका .
शिवसेना फुटली दोन गट पडले धनुष्यबाण शिंदेंना मिळाले, मुख्यमंत्री पदही शिंदेंना मिळाले पण खरी शिवसेना शिंदेंची की उध्दव ठाकरेंचे हा जरी प्रश्न वादाचा व चर्चेचा असला तरी काही गोष्टी शिंदेंना मिळाल्या नाहीत जसे की मार्मिक हे शिवसेनेचं मुखपत्र.याच मुखपत्रातून बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र व मुंबई एके काळी आपल्या व्यंगचित्रतून हादरवून सोडले होती .
याच मुखपत्रातून मुंबई व महाराष्ट्राचे प्रश्न बाळासाहेब मांडत मराठी भाषिकांची होणारी गळचेपी व मराठी भाषिकांवर होणारा अन्याय यातून सर्वांना समोर आणत. आणि यातून पुढे जाऊन स्थापन झाली शिवसेना मराठी माणसाच्या हक्काची संघटना मराठी माणसासाठी लढणारा महाराष्ट्राच्या हक्काचा पक्ष.
या सर्व गोष्टींना बराच काळ जरी झाला असेल तरी देखील आजही मार्मिकमधे कोणावर निशाणा साधला जाणार याकडे अनेकांचे लक्ष असते. यातूनच आता शिवसेना पासून वेगळे झालेले एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगचित्रातून जोरदार निशाणा साधण्यात आला.
विधानसभा निवडणुकीचा अगोदर जर महायुतीला जास्त जागा मिळाल्या तर पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा शिंदेंसह जवपास सर्वांनाच होत्या परंतू देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप हा महायुतीला सर्वात मोठा भाऊ बनला व शिंदेंचा मुख्यमंत्री पदाचा पत्ता कट झाला. त्यानंतर शिंदे नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. शिंदेंनी देखील मी बाहेरून राहून सरकारला पाठींबा देईल असे म्हणले परंतु नंतर त्यांनी पक्षातील नेत्यांच्या म्हणण्यानुसार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सरकारमध्ये सामील झाले. व देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाठींबा दिला यावरच आता शिवसेना उध्दव बाळासाहेब गटाने निशाणा साधत एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले व त्याला ‘झुकेगा मैं…’ शीर्षक देत शिंदेन वर निशाणा साधला.
Image credit samna
सामना वृत्तपत्रातून शिंदेंवर शिवसेनेची टीका.
महाराष्ट्र कर्नाटक सिमा वादावर संजय राऊतांची प्रतिक्रीया.
