बस प्रवासात अनेक वयोवृद्ध होती त्यांच्यासह माझा देखील दम गुदमरत होता.
News published by News24tas
पनवेल:- राज्य परिवहन महामंडळच्या ताफ्यातील बसची अवस्था जनतेला वेगळी सांगायची काही गरज नाहीये. अनेक बसची अवस्था ही इतकी बिकट झालेली आहे की त्यातून प्रवास करतांना जनतेला जीव मुठीत ठेऊन प्रवास करावा लागतो.त्यातच असाच काहीसा अनुभव मराठी अभिनेता ऋतुराज फडके याने सांगितला असून कश्या प्रकारे या बसचा प्रवास धोकादायक आहे हे सांगितले आहे.
मराठी अभिनेता ऋतुराज फडकेने पोस्ट शेअर करत दिली संपूर्ण प्रवास प्रकरणाची माहिती.
त्या बसमध्ये सगळ्यांचा जीव गुदमरत होता… अभिनेता ऋतुराज फडकेने शिवशाही बसमधील भयानक अनुभव केला शेअर केला असून संपूर्ण प्रकरण सविस्तर सांगितले आहे.
“आजचा दापोली – ठाणे, शिवशाही बस मधला अनुभव..
बाहेर खूप जास्त ऊन होतं, गरम होत होतं, म्हणून शिवशाही बसचं रिझर्वेशन केलं.. एक ७० km अंतर कापल्यानंतर शिवशाही गाडीचा एसी चालत नव्हता… Ac मुळे कुलिंग होण्या पेक्षा त्यातून गरम वाफा येत होत्या, ड्रायव्हर आणि कंडक्टरला तशी माहिती दिली… ड्रायव्हरने उत्तर दिलं ac असाच असतो इकडे, तेव्हा गाडी रामवाडी बस स्टॉप वर होती… तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता, परंतु तिथून त्याने गाडी नेली आणि प्रायव्हेट धाब्यावरती थांबवली तिथे जेवणासाठी अर्धा तास गाडी थांबली… त्यानंतर तर अजूनच गरम वाफा यायला लागल्या, बस मध्ये म्हातारी माणसं होती, जीव गुदमरत होता, शेवटी गाडी कशीबशी पनवेलला आली पनवेलला स्टॅन्डच्या बाहेरच ती बंद पडली,.. कशी बशी ती स्टँड मध्ये नेली आणि सगळ्यांना उतरायला सांगितलं, मी पनवेल मध्येच उतरून कॅब करून घरी येणार होतो, आणि आलो सुद्धा.. बस अंदाजे दुपारी अडीच पावणेतीन वाजता ठाणा डेपोत पोहोचते, आश्चर्य करणारी गोष्ट अशी मला एक रात्री आठ वाजता फोन आला, तुम्ही विसापूर स्टॉप वर चढलात ना? दापोली ठाणे बस मध्ये होतात ना?? मी म्हटलं हो… डेपोतून समोरच्या व्यक्ती म्हणाला मग बस कुठे आहे बस अजून पर्यंत ठाणा डेपोत आलेली नाहीये…
ही दुरवस्था शिवशाही बसची…” अभिनेता ऋतुराज फडके याने दोन दिवसांपूर्वी शिवशाही बस ची झालेली ही दुरावस्था लक्षात आणून दिली होती. त्याने लिहिलेल्या या पोस्टचा माध्यमांनी पाठपुरावा करत ही माहिती प्रतापराव सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचवली. प्रतापराव सरनाईक यांनी या बातमीची दखल घेतल्याचे आता समोर आले आहे आणि लवकरच प्रवाशांचे होणारे हाल निकाली लावले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
